Latest News

महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प

गुरुवार, २९ मे, २०१४



महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प या प्रकल्पामध्ये केवळ कृषि उत्पादन वाढविणे हे एकमेव उदिष्ट नसून, उत्पादनाचा दर्जा वाढविणे, पीक फेररचना, पाण्याचा सुयोग्य व काटेकोर वापर याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन, उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे, यावर भर देण्याचे धोरण आहे.

लाभार्थी निवड-

लाभार्थी निवड समितीत जिल्हास्तरीय समितीवर प्रकल्प संचालक आत्मा यांचे कार्यालय अधिनस्त प्रकल्प क्षेत्रात काम करणारे तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांचा समावेश असतो. ही योजना फक्त प्रकल्प क्षेत्राच्या लाभक्षेत्रात राबविली जाते. योजनेतील प्रामुख्याने प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व कृषि व्यावसायिकतेवर आधारित उपक्रम राबविण्यात येतात.

या प्रकल्पांतर्गत गाव स्तरावर एक किंवा दोन, तीन गावांमध्ये कृषि विज्ञान मंडळाची स्थापना करायची असून, या कृषि विज्ञान मंडळामध्ये 1,000 शेतकरी कुटुंबाचा समावेश असतो. या 1,000 शेतकरी कुटुंबाचे 20 प्रमाणे एकूण 50 गट तयार करायचे आहेत. निवडलेल्या 20 शेतकरी कुटुंबामधून एका प्रगतिशील शेतकऱ्याची निवड करावी. या प्रगतिशील शेतकऱ्याला कृषि सैनिक समजण्यात येते. त्याचप्रमाणे, 20 शेतकऱ्याचे 5 गट निवडण्यात येऊन त्यामधून 1 प्रगतीशील शेतकरी निवडण्यात येतो. निवडलेल्या 50 कृषि सैनिकांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. प्रति कृषिसैनिक रु.50 याप्रमाणे 50 कृषि सैनिकांसाठी एकूण रुपये. 2,500 प्रति वर्ग याप्रमाणे अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर गावपातळीवर पाणीवापर संस्था स्थापन करण्यात आलेल्या असून, या पाणीवापर संस्थेचा अंतर्गत कृषि विज्ञान मंडळाच्या कृषिमित्र शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते.

शेतकरी स्तरावरील प्रशिक्षण- 

हे प्रशिक्षण एक आणि तीन दिवसीय असते. दोन्ही प्रकारच्या वर्गामध्ये प्रत्येक वेळी 20 प्रशिक्षणार्थी असणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे-
महाराष्ट्र जलक्षेत्र प्रकल्पामध्ये जिल्हयांतर्गत, राज्यातंर्गत व राज्याबाहेर सहलींना अतिशय महत्व असून त्या-त्या ठिकाणी भेटी देऊन तेथील काही तांत्रिक गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्या वापरण्यासाठी शेतकरी आपोआप प्रवृत्त होतात.

पाणी व्यवस्थापन आधारित पीक प्रात्यक्षिके-
पीक उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या निविष्ठा म्हणजे पाणी, अन्नद्रव्य आणि पीकसंरक्षण औषधे यांची कार्यक्षमता वाढवून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याचा खर्च कमी करणे, हे अत्यंत गरजेचे आहे. गरजा व अग्रकम ओळखून त्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या चाचण्या प्रात्यक्षिकांमध्ये घेता येतात. सुधारित तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके ही पाणीवापर संस्थांतर्गत कृषि विज्ञान मंडळातील शेतकऱ्यांच्या शेतात आयोजित करण्यात येतात. पीक उत्पादन तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, चारापीक प्रात्यक्षिके, उच्चत्तम मूल्याकिंत फलोत्पादन पीक प्रात्याक्षिके, भाजीपाला रोपवाटिका प्रात्यक्षिके, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रात्यक्षिके, एकात्मिक कीड व्यवस्थापन प्रात्यक्षिके, पाण्याचा कार्यक्षम वापर प्रात्यक्षिके घेण्यात येतात. ही योजना मुंबई व मुंबई उपनगर वगळता सर्व 33 जिल्हयांत प्रकल्प क्षेत्रात राबविली जाते.

संपर्क- ही योजना राबविणची अथवा या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संबंधीत शेतकरी बांधवांनी प्रकल्प संचालक आत्मा यांच्या अधिनस्त प्रकल्प क्षेत्रातील तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा.

---- प्रमोद धोंगडे जि.मा.का. हिंगोली

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.