Latest News

शेतकऱ्यांच्या हिताची पिक विमा योजना

गुरुवार, १० जुलै, २०१४



खरीप हंगाम 2014-15 साठी केंद्र शासनाने भारतीय कृषी पिक विमा कंपनीच्या सहकार्याने पिक विमा योजना सुरु केली आहे. शेतकरी बांधवांसाठी ही योजना हितकारक व लाभकारक आहे. ही योजना समजावून घेऊन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे. वाचा या योजनेसंबंधीची सविस्तर माहिती...
राज्य व केंद्र सरकार मार्फत खरीप हंगाम 2014 साठी लागू केलेल्या राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा अंतिम मुदत जळगाव जिल्ह्यासाठी पिक निहाय पुढील प्रमाणे आहे.
पीक ज्वारी, बाजरी, मका उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कापूस, कांदा पीक पेरणीपासून 1 महिना किंवा 31 जुलै 2014 या पैकी जे आधी असेल ते, ऊस (आडसाली) लागवडी पासून 1 महिना किंवा 3. सप्टेंबर 2014 या पैकी जे आधी असेल ते, ऊस (पूर्व हंगामी) लागवडी पासून 1 महिना किंवा 31 डिसेंबर  2014 या पैकी जे आधी असेल ते, ऊस (सुरु) लागवडी पासून 1 महिना किंवा 31 मार्च  2015 या पैकी जे आधी असेल ते, ऊस (खोडवा) लागवडी पासून 1 महिना किंवा 31 मे 2015 या पैकी जे आधी असेल ते,

उत्पन्नावर आधारित भरपाई
·  या योजनेतून पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा सरंक्षण पुरविण्यात येणार आहे.
·  यासाठी कृषि आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेण्यात येणाऱ्या पीक सर्व्हेक्षण अंदाजाच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
·   यासाठी अधिसूचीत मंडळ किंवा मंडळ गटात किमान 10 पीक कापणी प्रयोग आणि अधिसूचीत तालुका किंवा गटामध्ये किमान 16 पीक कापणी प्रयोग घेणे बंधनकारक आहे. या प्रयोगावर आधारित खरीप पिकांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी कृषि विभागामार्फत पार पाडण्यात येत आहे.

वैयक्तिक पातळीवर भरपाई
· पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे. 

· यासाठी स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबधित शेतकऱ्यांनी ज्या बँकेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्यांना किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला नुकसान झाल्यापासून 48 तासाच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचीत पिकांची माहिती व नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.

· 
यानंतर विमा कंपनी मार्फत जिल्हा महसूल विभाग किंवा कृषि विभागाच्या मदतीने भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे. हवामान आधारित पीक विमा योजना खरीप हंगाम 2014 मध्ये जे शेतकरी सहभागी होवू शकले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना सदर योजना लागू राहिल.

· 
सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे.

· 
तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विमा हप्त्यामध्ये 10 टक्के सूट राहिल.

विमा हप्ता दर  पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांना भरावयाची विमा हप्ता रक्कम पुढील प्रमाणे आहे. -

खरीप हंगाम 2014-15 पीक निहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व रक्कम
अ.क्र.
पीक
जोखीम स्तर
(टक्के)
सर्वसाधारण विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळी पर्यंत)
अतिरिक्त विमा संरक्षण प्रति हेक्टर (उंबरठा उत्पनाच्या 150टक्के पर्यंत)
विमा संरक्षित रक्कम
शेतकऱ्यांनी अदा करावयाची विमा हप्ता
विमा संरक्षित रक्कम
शेतकऱ्यांनी अदा करावयाची विमा हप्ता
1
ख. ज्वारी
60
11800
266
295
17700
1505
1505
2
बाजरी
60
6400
202
224
9600
1872
1872
3
मका
60
21400
482
535
32000
1360
1360
4
उडीद
60
13100
295
328
19600
4704
4704
5
मूग
60
12100
272
303
18100
5068
5068
6
तूर
60
18700
421
468
28000
2520
2520
7
भुईमूग
60
23800
750
833
35600
4628
4628
8
तीळ
60
8100
255
284
12000
1920
1920
9
सोयाबीन
60
17200
542
602
25800
4902
4902
10
कापूस
60
21200
2480
2756
31900
4147
4147
11
कांदा
60
97000
14841
16490
145400
24718
24718
12
ऊस (आडसाली)
80
181100
13039
14488
158500
12680
12680
13
ऊस
(पूर्व हंगामी)
80
157100
10604
11783
137400
10305
10305
14
ऊस (सुरु)
80
144300
10390
11544
126200
10096
10096
15
ऊस (खोडवा)
80
124300
9509
10566
108700
9240
9240
      
तरी सर्व शेतकऱ्यांनी सदर विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आपले बॅंक खाते ज्या राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेत आहे, त्या बॅंकेशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव (0257- 222931 उपविभागीय कृषि अधिकारी,) अंमळनेर (02587 - 222516) उपविभागीय कृषि अधिकारी, पाचोरा (02596 - 244343) येथे संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालय,

जळगाव

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.