Latest News

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : रोजगाराबरोबर गावाचा विकासही

शुक्रवार, ११ जुलै, २०१४



महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे ग्रामीण भागतील मजुरांचा आर्थिक विकास साधणारी योजना आहे. कामाच्या शोधासाठी गावातील मजूर गाव सोडून शहरामध्ये येतात. अशावेळी त्यांच्या गावातच त्यांना रोजगार देवून मजुरांचे स्थलांतर थांबवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करीत असतांना गावांमध्ये मजुरांना काम व रोजगार उपलब्ध होतो. पर्यायाने गावाचा विकासही साधला जातो.

योजनेची वैशिष्ट्ये

•  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची वैशिष्ट्ये म्हणजे या योजनेअंतर्गत मजुरांना वर्षभर रोजगाराची हमी मिळते. गावात पायाभूत सुविधांचा विकास होतो. 

•  या योजनेतून झालेल्या कामामुळे गाव स्वयंपूर्ण व स्वावलंबी होते. तसेच मजुरीची प्रदाने 9-PMS प्रणालीद्वारे मजुरांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. 

•  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामामध्ये 'माझं शेत, माझं काम' अशा प्रकारच्या कामाचा समावेश होतो. 

•  त्यामध्ये सिंचन विहीरी, शौचालये, गायी व शेळ्यांचा गोठा, शेत तळे, कृषी विषयक कामे जसे की, कंपोस्टिंग, गांडूळ खत व अमृतपाणी, शेतीची बांधबंदिस्ती व दुरुस्तीची कामे याचा अंतर्भाव होतो. 

•  सार्वजनिक लाभाच्या कामाअंतर्गत वनीकरण, वृक्षलागवड, शेतरस्ते, पांदण रस्ते, जलसंधारण/जलसंवर्धनाची कामे, गाळ काढणे, गांव नाला दुरुस्ती, राजीव गांधी सेवा मदत केंद्र, सिमेंट रस्ते व क्रीडांगणाची कामे यासारख्या बाबींचा समावेश होतो.

गोंदिया जिल्ह्यातील योजनेची फलश्रृती 

•  या योजनेअंतर्गत वर्ष 'एप्रिल 2014 पासून गोंदिया जिल्ह्यात चौतीस हजार मजुरांना काम देण्यात आले आहे.

•  मगांराग्रारोहयो अंतर्गत दिनांक 1 जुलै 2014 रोजी ग्रामपंचायत स्तर व यंत्रणास्तरावर अकरा हजार सहाशे चौदा एवढी मजूर उपस्थिती होती. 

•  त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील 129 कामांवर 3 हजार 189 मजूर, गोरेगांव तालुक्यातील 51 कामांवर 1 हजार 14 मजूर, तिरोडा तालुक्यातील 49 कामांवर 726 मजूर, आमगांव तालुक्यातील 97 कामांवर 1 हजार 662 मजूर, सालेकसा तालुक्यातील 86 कामांवर 1 हजार 659 मजूर, देवरी तालुक्यातील 84 कामांवर 917 मजूर, सडकअर्जुनी तालुक्यातील 118 कामांवर 1 हजार 862 मजूर, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 22 कामांवर 585 मजूर उपस्थित असून या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांकरीता जिल्हयातील एकुण 636 काम करण्यात येत असून 11 हजार 614 मजूर काम करीत आहेत. 

•  या योजनेअंतर्गत वर्ष 2013-14 निहाय प्रगतीचा आढावा घेत असता वर्ष 2013-14 मध्ये आमगाव, अर्जुनी/मोरगाव, देवरी, गोंदिया, गोरेगाव, सडक-अर्जुनी, सालेकसा, तिरोडा मिळून 40 लाख 87 हजार मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते जे 32 लाख 27 हजार 145 झाले म्हणजेच 78.96 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले.


•  वर्ष 2013-14 अंतर्गत प्रगती पाहता नियोजन व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यात आली व जिल्हा प्रशासनातील प्रमुख जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी.शिंदे यांनी काटेकोरपणे व नियोजनबद्ध पध्दतीने योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत व त्या उपक्रमाला यशही मिळाले.

•  लेबर बजेट आर्थिक वर्ष 2014-15 नुसार प्रगतीचा आलेख हा योग्य नियोजनामुळे उंचावलेला दिसतो. 

•  आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये आमगाव तालुक्याला 3 लाख 66 हजार 100 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 63.41 टक्के काम पूर्ण झाले असून अर्जुनी मोरगाव तालुक्याला 5 लाख 19 हजार 600 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 51.02 टक्के, देवरी तालुक्यातील 5 लाख 76 हजार 500 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 55.60 टक्के, गोंदिया तालुक्यातील 6 लाख 73 हजार 600 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 60.20 टक्के, गोरेगाव येथे 3 लाख 25 हजार 200 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 44.40 टक्के , सडक अर्जुनी येथे 3 लाख 14 हजार 400 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 36.32 टक्के, सालेकसा येथे 2 लाख 78 हजार 400 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 74.99 टक्के, तिरोडा तालुक्यातील 4 लाख 94 हजार 500 मनुष्य दिवस निर्मिती करण्याचे 67.94 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. एकूण 35 लाख 48 हजार 300 मनुष्य दिवस निर्मितीचे 8 जुलै 2014 पर्यंत 63 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. 

•  आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये या योजनेअंतर्गत 32 करोड 66 लाख 14 हजार रुपये एकूण खर्च करण्यात आला आहे. योजना राबविण्याच्या 1 एप्रिल 2014 ते जुलै 2014 पर्यंत झालेले 63 टक्के काम हे अवघ्या 3 महिन्यांमध्ये झाले आहे. हे योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणीचे फलित आहे. हे मात्र निश्चित.


- पल्लवी धारव
जिल्हा माहिती कार्यालय
गोंदिया

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.