Latest News

मुंबईचे ‘गतिमान’ मार्ग

बुधवार, १८ जून, २०१४



पांजरपोळ-घाटकोपर लिंक रोड आणि खेरवाडी उड्डाणपूलाचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. या दोन प्रकल्पाची काही ठळक वैशिष्ट्ये : 

•  मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत पांजरपोळ-घाटकोपर लिंक रोड आणि खेरवाडी उड्डाणपूल असे दोन प्रकल्प वेळेत पूर्ण झाले असून हे दोन्ही प्रकल्प दिनांक 16 जून 2014 पासून वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे.

•  या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबई अधिक गतिमान होण्याबरोबरच या परिसरातील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे.

•  मुंबईतील इस्टर्न फ्री वे तीन टप्प्यात विभागला गेला आहे. म्युझियम ते आणिक आणि आणिक ते पांजरपोळ रस्ता जून 2013 मध्येच खुला करण्यात आला आहे. या फ्री वे मधील तिसऱ्या टप्प्यातील चेंबूर-मानखुर्दला जोडणाऱ्या पांजरपोळ - घाटकोपर या तीन किलोमीटरच्या रस्त्यामुळे या फ्री वे वरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

•  मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मोनो, मेट्रो, फ्री वेच्या माध्यमातून राज्य शासन मुंबईचा कायापालट करण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून राबविण्यात येणारे हे प्रकल्प मुंबईतील वाहतूक जलद आणि पूर्ण क्षमतेने होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

•  रस्ते हे राज्याच्या विकासाचे प्रतिक असतात. विकासाच्या प्रक्रियेत दळणवळणासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगल्या रस्त्यांमुळे दळणवळण पूर्ण क्षमतेने होते. वेगवान आणि अपघातरहित वाहतूक झाल्यास विकासाचा वेग वाढणार आहे.

•  पांजरपोळ- घाटकोपर जोडरस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या उन्नत मार्गाची लांबी सुमारे 3 किमी तर रुंदी 17.2 मीटर आहे. तसेच या उन्नत मार्गाची सर्वाधिक उंची 22 मीटर आहे.

•  मुंबईतील महत्त्वाचा दुसरा प्रकल्प म्हणजे खेरवाडी उड्डाणपूल. खेरवाडी आणि कलानगर येथील प्रचंड वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने खेरवाडी येथील उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले. प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबर 2013 मध्ये सुरुवात झाली. या उड्डाणपुलामध्ये खेरवाडी पुलाचे काम केवळ आठ महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे. 

•  मुंबईतील आजपर्यंत झालेल्या उड्डाणपुलांमध्ये सर्वात वेगाने झालेले बांधकाम (सुमारे 8 महिन्यांत) असून सुमारे 22 कोटी रूपये खर्चून बांधलेल्या या पुलामुळे पश्चिम द्रुतगती महार्गावर सिग्नल विरहित वाहतूक होणार आहे. याचा फायदा या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना होणार आहे. वेळेसह इंधनामध्येही यामुळे बचत होणार आहे.

•  खेरवाडी उडडाणपुलाची दक्षिण मार्गिकेचे वैशिष्य्ा म्हणजे एकूण 580 मीटर या मार्गिकेची लांबी असून यामध्ये 3 मार्गिका आहेत. तसेच 28 मीटर लांबीचा मध्यवर्ती गाळा आणि 20 मीटर लांबीचे 4 गाळे आहेत. व्हायाडक्टची लांबी 108 मीटर आहे.

•  या दोन्ही प्रकल्पांमुळे प्रवाशांच्या इंधन व वाहतूकीच्या वेळेत बचत होणार असून ध्वनी व हवाप्रदुषण कमी होण्यात मदतच होणार आहे.


वर्षा आंधळे
(पांजरापोळ – घाटकोपर लिंक रोड व खेरवाडी उड्डाणपूल या प्रकल्पातील अनुभव वाचा 'फर्स्ट पर्सन'मध्ये)

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.