Latest News

आरोग्य सेवेचा अध्याय...

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०१४



राज्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच गोरगरिबांना आरोग्य विषयक सुविधा मिळण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या असून त्याचा लाभ राज्यातील लाखो लाभार्थ्यांना होत आहे. आरोग्यम् धनसंपदा. ही बाब लक्षात घेता या योजना राबविल्या जातात. नागरिकांचे आरोग्य ठिक तर राज्य निरोगी. अशाच काही योजनांची व शासनाने केलेल्या आरोग्य विषयक कामांची माहिती असलेला हा लेख.
  • आपत्कालीन वैद्यकीय सेवा, ब्लड ऑन कॉल, औषधांचा मोफत पुरवठा, 108 ॲम्ब्युलन्स सेवा यासारख्या योजना राज्यात यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.
  • त्यामुळे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेचा नवा अध्याय महाराष्ट्रात सुरु झाला आहे.
  • शासनाने आरोग्यविषयक सुविधांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्याची अंमलबजावणीही प्रभाविपणे सुरू आहे. 
  • गुटखा व पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी हा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे.
  • तसेच राज्य शासनाच्या चार आयुर्वेदिक महाविदद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयामार्फत सुवर्ण प्राशन संस्कार शिबिरे घेण्यात आली.
  • या शिबिरात राबविलेल्या उपक्रमांतर्गत वर्षभरात महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील सुमारे 5 ते 6 लाख बालकांना लाभ मिळाला आहे.
  • केंद्र शासनाच्या जननी शिशु सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर महिला आणि नवजात शिशुंना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार होत असून रुग्णालयात ने-आण करण्यासाठी मोफत सुविधाही उपलब्ध आहेत.
  • अलिबाग, नंदुरबार, सातारा आणि मुंबई येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मंजुरी मिळाली असून अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी एम.आय.डी.सी. ची जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • आरोग्य संस्थांचे बळकटीकरण आणि नवीन आरोग्य संस्था उभारणीसाठी बृहत आराखडा तयार असुन त्यानुसार 1,252 नवीन आरोग्य संस्थांचे जाळे संपूर्ण राज्यभर विणण्यात येऊन त्याद्वारे 56 आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन शक्य होईल.
  • आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ झाल्याने बालमृत्यू आणि मातामृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली.
  • गर्भपात केंद्रांच्या तपासणीची धडक मोहीम राबविल्याने आतापर्यंत 483 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. 
  • विप्रो कंपनी सोबत करार करुन शासनामार्फत सीटी स्कॅन, एम.आर.आय, सोनोग्राफी, एक्स रे या सुविधा राज्यातील 35 रुग्णालयांमध्ये उपलब्ध असून जनतेस खाजगी सोनोग्राफी केंद्रांकडे या सुविधांसाठी धाव घ्यावी लागणार नाही.
  • रुग्णांना सुरक्षित आणि तात्काळ रक्त मिळावे या हेतूने ब्लड ऑन कॉल जीवन अमृत सेवा योजना कार्यन्वित केली आहे.
  • आपत्कालीन सेवा देणाऱ्या 937 रुग्णवाहिका खाजगी /सार्वजनिक भागीदारी प्रकल्पातून उपलब्ध आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना

  • सामान्य नागरिकाला गंभीर आजारांवर महागडे वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रीया करणे सुलभ व्हावे यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना प्रायोगिक तत्वावर 8 जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेला मिळालेल्या यशामुळे आता ती संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे.
  • वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये असणाऱ्या केशरी व पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • प्रतिवर्ष प्रतिकुटूंबास दीड लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.
  • राज्यातील 304 शासकीय व खाजगी रुग्णालये या योजनेत सहभागी आहेत. या योजनेंतर्गत 971 प्रोसीजर्स व 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहेत.
  • रुग्णालयांत हेल्थकार्ड दाखविल्यास त्यांची संगणकीय छाननी करुन पात्र लाभार्थ्यांवर उपचार केले जातात.
  • या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार झालेला आहे.
  • योजनेतंर्गत आतापर्यंत दोन लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

सुरक्षित जल सुरक्षित आरोग्य 

  • सुरक्षित जल सुरक्षित आरोग्य योजनेतंर्गत ग्रामीण आणि नागरी भागातील जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी राज्य शासनामार्फत विशेष योजना राबविण्यात येतात.
  • त्याचबरोबर व्यक्तिगत शौचालयासाठी सहाय्य देण्यात येते.
  • अनुसूचित जाती आणि नवबौध्द कुटुंबांना घरगुती पाणी जोडणी आणि वैयक्तिक शौचालये उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्णजयंती दलित वस्ती नागरी पाणीपुरवठा आणि आरोग्यरक्षण योजना.
  • आजवर 63,086 कुटूंबांना या योजनेखाली पाणीपुरवठा आणि आरोग्यरक्षण सुविधा उपलब्ध.
  • केंद्र शासनाच्या एकात्मिक कमी खर्चाची शौचकूप योजनेंतर्गत नागरी क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान.
  • योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत 39,486 वैयक्तिक शौचालये मंजूर.
  • यापैकी 25,627 शौचालयांचे बांधकाम पूर्ण. आजवर 9,523 ग्रामपंचायती तर 11 पंचायत समित्यांना निर्मल ग्राम पुरस्कार मिळाले.

निशा कदम
जिल्हा माहिती कार्यालय,
रायगड-अलिबाग

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.