Latest News

राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा ‘108’ - रुग्णांसाठी अत्यावश्यक सुविधा

बुधवार, ०६ ऑगस्ट, २०१४


चित्रफीत पाहण्यासाठी खाली पहा...
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या संयुक्त उपक्रमातून राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सातारे जिल्ह्यात 26 जानेवारीपासून सुरु करण्यात आली आहे. या योजनेविषयी थोडक्यात माहिती...
  • महाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा ही योजना या माध्यमातून गरजू रुग्णांना अगदी मोफत पुरविण्यात यशस्वी झाली असून सातारा जिल्ह्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशा 31 रुग्णवाहिका रुग्णांसाठी अगदी मोफत उपलब्ध आहेत. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रतिक्षा आहे ते केवळ रुग्णांनी तसेच नातेवाईकांनी 108 या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करण्याची. 
  • महामार्ग असो वा कोणतेही ठिकाण 108 या क्रमांकावर फोन करताच अवघ्या 20 ते 30 मिनिटात ही रुग्णवाहिका वैद्यकीय उपचार पथकासह रुग्णांच्या दारात हजर होते. 
  • ही रुग्णवाहिका कृत्रिम श्वसन यंत्रणा, शॉक मशिन, प्राणवायूचे सिलेंडर, मॉनिटर आणि वैद्यकीय पथक यासह सज्ज असते. 
  • 108 या क्रमांकाला रुग्णांनी तसेच गरजू नातेवाईकांनी दूरध्वनी केल्यास संबंधिताच्या ठिकाणची माहिती घेऊन ही रुग्णवाहिका तेथे जाते व रुग्णावर तातडीने मोफत उपचार सुरु केले जातात.
  • सातारा जिल्ह्यात 31 रुग्णवाहिका उपलब्ध असून प्रत्येक तालुक्यात त्या 20-20 किमी अंतरावरील ठिकाणांवर ठेवण्यात आलेल्या आहेत, जणू एक प्रकारे जाळे निर्माण केले आहे. 
  • रुग्णांवरील उपचारास विलंब होऊ नये, त्याला तातडीचे उपचार मिळावेत या हेतूने ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. 
  • या सुविधेसाठी जिल्ह्यातून दररोज 70 ते 80 दूरध्वनी 108 या क्रमांकावर येत आहेत. आत्तापर्यंत हजारो रुग्णांवर या सुविधेंतर्गत तातडीने अगदी मोफत उपचार करण्यात आले आहेत. 
  • महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली ही अत्यंत चांगली रुग्णांना संजिवनी देणारी योजना आहे. 
  • घरात एकटे असणारे वृद्ध असो, महामार्गावर झालेला अपघात असो वा प्रसूतीच्या वेळी ही सुविधा जीवनदायी ठरली आहे. 
  • याअंतर्गत हृदय विकाराचा धक्का, पोटाचे विकार, सर्पदंश, पक्षाघात, विषबाधा, तातडीच्या कुठल्याही अपतकालीन वैद्यकीय सेवेच्या मदतीसाठी रुग्णांनी अथवा नातेवाईकांनी केवळ 108 या टोल फ्री क्रमांकावर दूरध्वनी करावयाचा. 
  • प्रशिक्षित वैद्यकीय पथक आणि औषधांसह ही रुग्णवाहिका रुग्णाच्या घरी अवघ्या 20 ते 30 मिनिटात पोहचते आणि संबंधितावर उपचार सुरु करते तेही अगदी मोफत. 
  • त्यानंतर रुग्णाला जवळच्या शासकीय अथवा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येते. 
  • राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी राज्य शासनाने सुरु केलेली ही मोफत उपचाराची सुविधा खूपच चांगली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी 108 या टोल फ्री क्रमांकावर अधिकाधिक दूरध्वनी करावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे. 
  • राज्य शासनाची ही रुग्णांसाठी तसेच सर्वसमान्यांसाठी जीवनदायी ठरणारी सुविधा असून रुग्णांना या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यायला हवी. 

- प्रशांत सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

No comments:

Post a Comment

ई-योजना Designed by Templateism.com Copyright © 2014

Theme images by Bim. Powered by Blogger.